Ad will apear here
Next
वेध ‘स्व’चा
अनेकदा प्रत्येकाला वेगळे काहीतरी करायचे असते; पण हे वेगळे काय हे ठरविताना स्वत:चा शोध आधी घेतला की पुढील वाट सुकर होते. त्यात कितीही अडथळे आले तरी ते पार करण्याची हिंमत येते, असे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न ‘वेध ‘स्व’चा’मधून भुजंगराव शेळके यांनी केला आहे.

माणूस म्हणून जगण्यासाठी काय करावे, करियर व समाधानाची सांगड, नोकरीबद्दलची वास्तविकता जाणून घेणे श्रेयस्कर कसे असते, हे त्यांनी सांगितले आहे. वेगळी वाट निवडण्याची वेळ, यासाठी सर्वांच्या मान्यतेबरोबरच स्वत:च्या अंत:करणाचा विचार करणे, स्वत:चे कौशल्य इतरांपुढे मांडणे, स्वतःच्या सामर्थ्याचा विचार करून पुढची वाटचाल करताना ध्येयासाठी जगणे, तसे जगण्याचे फायदे यातून समजतात. स्वत: मधील कौशल्याचा शोध घेण्यासाठी चार मुद्दे यात आहेत. यशाची व्याख्या कशी ठरवावी हे सांगताना विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली आहे. यात शिव नाडर, डॉ. सुभाष चंद्रा, जीओनी रोलिंग, किरण मजुमदार शॉ यांसारखे प्रथितयश आहे. त्यांच्यापासून आपण कोणती शिकवण घ्यावी, हेही नमूद केले आहे.

स्वतःची स्वप्ने, स्वतःच्या कल्पना जाणून आयुष्य खरेच परिपूर्णतेने, आनंदाने जगण्याची तसेच आयुष्यात काहीतरी महत्त्वपूर्ण कमविण्याची, मिळविण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावे. आपण अगदी लहानपणापासून स्पर्धेच्या वातावरणात राहतोय, किंबहुना या स्पर्धेलाच आपली संस्कुती मानतोय. त्यामुळे काही वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धेमुळे मनामध्ये एक रितेपणा निर्माण होत आहे. ‘कराव्या लागतात म्हणून काही गोष्टी करतोय,’ ही मानसिकता वाढते. असा जगण्यातला अर्थ कमी होत आहे.

जगण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत उद्देश शोधण्याच्या आपल्या क्षमतेची जाणीव व्हावी व त्यासाठी आपण अंतरंगातील होकायंत्राशी मैत्री कशी करायची ते या पुस्तकातून तुम्हाला समजेल. स्वतःमध्ये कोणते सुप्तगुण आहेत, ते कसे विकसित करायचे, स्वतःच्या आयुष्याचे ध्येय तरी काय आहे, या अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनातून मिळतील.

पुस्तक : वेध ‘स्व’चा
लेखक : भुजंगराव शेळके
प्रकाशक : अभिज्ञ पब्लिकेशन
पाने : १९२
किंमत : २३० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZLZBW
Similar Posts
कर्दळीवन : एक अनुभूती ‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रगटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी येथे भेट दिली. तेथील परिसर, तेथील सर्व माहिती त्यांनी घेतली
मज्जानो मंडे शालेय विद्यार्थी असोत अथवा महाविद्यालयीन किंवा नोकरदार असोत, बहुतेकांना सोमवार म्हटले की अंगावर काटा येतो. कारण आठवड्याचा हा पहिला दिवस. रविवारची सुट्टी संपवून अभ्यास किंवा कामाला सुरुवात करण्याचा हा दिवस पण हा दिवस कसा चैतन्यदायी, ऊर्जादायी असू शकतो, हे नविन काळे यांच्या या पुस्तकातील लेखांमधून समजते
महामानव + निखाऱ्यावर भाजलेल्या माझ्या मुलांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नव्या पिढ्यांना समजावे आणि त्यांनी त्यापासून प्रेरणा घेऊन नवा भारत घडविण्यासाठी काम करावे, या उद्देशातून निर्माण झालेल्या साहित्यात प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या या दोन्ही पुस्तकांची नोंद घ्यावी लागेल.
आयुष्याची गोळाबेरीज ‘आयुष्याची गोळाबेरीज’ हे ग. ना. केळकर यांचे पुस्तक दोन भागांत आहे. पहिल्या भागात त्यांचे आत्मचरित्र आहे. ते त्यांनी आयुष्यभर ठेवलेल्या अनेक नोंदीवर आधारित आहे. त्यांच्या आयुष्यात आलेले आश्चर्यकारक प्रसंग, योगायोगाने जुळून आलेल्या घटना, दैवी कृपेने टळलेले दुर्धर प्रसंग अशा सर्व हकिकतींचा प्रसंगानुरूप घेतलेला आढावा आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language